Pune Pimpri Chinchwad Crime News | मौजमजेसाठी रिक्षा चोरणारा भारती विद्यापीठ पोलिसांकडून गजाआड, दोन रिक्षा जप्त

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मौजमजा करण्यासाठी पुणे शहरातून रिक्षा चोरणाऱ्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून तीन लाख रुपये किंमतीच्या दोन रिक्षा जप्त करुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (Bharati Vidyapeeth Police Station) दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई कात्रज स्मशान भूमीजवळ केली. सादीक अलताफ शेख (वय-22 रा. गल्ली नं.1, भराडे वस्ती, येवलेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान पोलीस अंमलदार अनिल भोसले व हर्षल शिंदे यांना कात्रज स्मशान भूमीजवळ एक तरुण चोरीची रिक्षा घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सादीक शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या रिक्षाबाबत (एमएच 12 क्यु आर 3058) चौकशी केली असता रिक्षा चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडे केलेल्या तपासात त्याच्याकडून तीन लाख रुपये किंमतीच्या दोन रिक्षा जप्त करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे,
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील,
सहायक पोलीस आयुक्त नंदिनी चग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील,
पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीशकुमार दिघावकर, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अनिल भोसले,
हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, बापु भिंगारे, विठ्ठल चिपाडे, मिलींद गायकवाड, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारवकर,
निलेश जमदाडे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अवधुत जमदाडे, अभिजीत जाधव, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे,
अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.