Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाईल चोरले, तर सिंहगड रोड परिसरात फोटोग्राफरचा कॅमेरा पळवला

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात जबरी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्त्याने मोबाईलवर बोलत जणाऱ्यांचे मोबाईल हिसकावून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. सिंहगड रोड परिसरात फोटोसेशन करण्यासाठी जात असताना एका फोटोग्राफरचा 1 लाख 70 हजार रुपयांचा कॅमेरा दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. हा प्रकार 16 जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास धायरी येथील लोकमत प्रेस समोर घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत विकास रामभुवन तिवारी (वय-34 रा. धाडगे इस्टेट, नांदेड फाटा, सिंहगड रोड, पुणे) यांनी सोमवारी (दि.22) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांविरोधात आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्य़ादी हे फोटोग्राफर असून ते कॅमेरा हातात घेऊन नांदेड गावातुन चालत सिंहगड रोडने धायरी ब्रिजकडे रात्रीचे फोटोसेशन करण्यासाठी जात होते.

त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांना धक्का दिला. फिर्यादी यांच्या हातातील एक लाख 70 हजार रुपयांचा कॅमेरा जबरदस्तीने हिसकावून नेला. फिर्यादी यांनी आरडाओरडा करुन त्यांच्या मागे धावले. मात्र चोरटे दुचाकीवरुन सिंहगड रोडने धायरी ब्रिज च्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले.

चाकूच्या धाकाने मोबाईल चोरले

मित्रासोबत रस्त्यावरुन पायी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी तरुणाला चाकूचा धाक दाखवून
खिशातील तीस हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरुन नेले. हा प्रकार रविवारी (दि.21) रात्री साडे दहाच्या सुमारास पासोड्या विठोबा मंदिर रोडवर घडली आहे. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विजय हरीचंद्र माने (वय-25 रा. बोकडेवाडी फाटा, हिंजवडी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

ससून हॉस्पिटल गेटसमोर मोबाईल हिसकावला

ससून हॉस्पिटलच्या गेट समोरील रस्त्यावरुन मोबाईलवर बोलत जात असताना पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी जबरदस्तीने 25 हजार रुपयांचा मोबाईल चोरुन नेला.
हा प्रकार 19 जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडला.
याप्रकरणी चेतन संजय घोरपडे (वय-30 रा. हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तंबाखू मागून मोबाईल पळवला

कंपनीचे कर्मचाऱ्यांना वाघोली गाव, केसनंद फाटा येथील बस स्टॉपवर सोडून त्या ठीकाणी थांबलेल्या बस
चालकाकडे अनोळखी व्यक्तीने तंबाखूची मागणी केली. तसेच पुणे स्टेशन येथे सोडता का अशी विचारणा केली.
त्यावेळी बस चालकाने अनोळखी व्यक्तीला बसमध्ये बसण्यास सांगितले. गाडीत बसत असताना अनोळखी व्यक्तीने
बस चालकाचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून चोरुन नेला.
याबाबत सुरेश रामदास कोल्हे (वय-32 रा. वारजे माळवाडी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.