Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : क्रिकेट खेळण्यावरुन तरुणांमध्ये राडा, दोघांना बेदम मारहाण; 8 जणांवर FIR

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळण्यावरुन झालेल्या वादातून आठ जणांच्या टोळक्याने दोन तरुणांना लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.21) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जनता वसाहत येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत रत्नदीप संपत रणखांबे (वय-23 रा. जनता वसाहत, पर्वती) याने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शंकर काकडे, रोहित गोरखे, पवन कोळी, आकाश धांगडे, अनुज गोरखे, जीवन शिंदे, मल्हारी, संदीप जोगदंडकर यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 143, 147, 149 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रत्नदीप रणखांबे हा त्याच्या मित्रांसोबत मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत होता. त्यावेळी आरोपी शंकर काकडे त्याठिकाणी आला. त्याने तुम्ही येथे खेळायचे नाही असे सांगितले. यावरुन फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला. त्यावेळी जवळ उभे असलेल्या शंकरचे साथीदार त्याठिकाणी आले. त्यांनी रत्नदीप व त्याचा मित्र अल्ताफ सय्यद याला शिवीगाळ करुन लागडी दांडक्याने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.