Pune Pimpri Chinchwad Crime News | अश्लील बोलून 14 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, दोघांना अटक; मार्केटयार्ड परिसरातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | रस्त्याने जाणाऱ्या 14 आणि 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलींसोबत अश्लील बोलून विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी (Pune Police) दोघांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.2) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास मार्केटयार्ड (Market Yard) गेट नंबर 7 समोर घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 30 वर्षीय आईने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मानव संदिप अडागळे Manav Sandeep Aadagale (वय-20 रा. प्रेमनगर वसाहत, मार्केटयार्ड), आकाश दादा सोनवणे Akash Dada Sonawane (वय-26) यांच्यावर आयपीसी 354, 354(ड), 504, 506, 34 सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) कलम 11, 12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 14 वर्षाची मुलगी तिच्या 15 वर्षाच्या मैत्रणीसोबत मार्केटयार्ड येथील
गेट नं.7 समोरून जात होत्या. त्यावेळी आरोपी पान शॉप येथे थांबले होते.
आरोपींनी मुलींकडे पासून तुम्ही दोघी खुप छान दिसता असे म्हणत अश्लील कमेंट केली. तसेच आरोपी आकाश सोनवणे याने फिर्यादी यांच्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवून अश्लील वर्तन करुन मुलीचा विनयभंग केला. मुलीने हा प्रकार घरात सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.