Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन कॉलेज तरुणीचा विनयभंग, रिक्षाचालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | कॉलेज तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करुन लग्नासाठी जबरदस्ती केली. तसेच तिचा हात पकडून गैरवर्तन केल्याप्रकरणी रिक्षाचालकावर हडपसर पोलीस ठाण्यात (Pune Police) पोक्सो सह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते शनिवार (दि.23 डिसेंबर) या दरम्यान तरुणीच्या घराच्या व कॉलेज परिसरात तसेच ग्लायडिंग सेंटर (Gliding Center) व कॅम्प (Pune Camp) येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत हडपसर परिसरातील काळेपडळ येथे राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने सोमवारी (दि.25) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन महेश पाटील (वय-27 रा. खंडोबा माळ, भोसरी) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 506, सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश पाटील रिक्षाचालक (Rickshaw Driver) आहे.
त्याने फिर्यादी तरुणीचा तिच्या राहत्या घराच्या परिसरात तसेच ग्लायडिंग सेंटर येथे पाठलाग केला.
फिर्यादी कॉलेजला गेल्या असता पाटील याने कॉलेज परिसरात तरुणीचा पाठलाग केला.
तसेच तरुणीचा हात पकडून त्याच्यासोबत लग्न करण्याची जबरदस्ती केली. त्यावेळी तरुणीने हात झटकून त्याच्या सोबत लग्नाला नकार दिला. यामुळे चिडलेल्या आरोपीने तरुणीला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कामठे (PSI Kamathe) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.