Pune Air Pollution | हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायीक, मेट्रो प्रशासनाला महापालिकेची नोटीस

प्रदूषण कमी करण्यासाठी 17 चौकांमध्ये 25 मिस्ट बेसड् फाउंटनची उभारणी

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Air Pollution | हवेचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. राज्य प्रदूषण नियामक महामंडळाच्या (Maharashtra State Pollution Control Board) आदेशानुसार महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) सर्व बांधकाम व्यावसायीकांना (Builders In Pune) तसेच कामाच्या ठिकाणी धुळीपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती पाठविण्यासाठी नोटीसेस पाठविण्यात आल्या आहेत. त्याचवेळी प्रामुख्याने गर्दीच्या चौकांमध्ये लवकरच मिस्ट बेसड् फाउंटन उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १७ चौकांमध्ये २५ फाउंटन उभारण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. (Pune Air Pollution)

मागील काही महिन्यांपासून हवेचे प्रदूषण वाढले आहे. वाहनांच्या धुरासोबतच बांधकामांच्या ठिकाणी होणार्‍या धुलीकणांमुळे श्‍वसनाच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये मागील काही आठवड्यांपासून हवेचे प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. तीच परिस्थिती मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्येही उदभवली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्य प्रदूषण नियामक महामंडळाने देखिल प्रदूषण कमी करण्यासाठी काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेने गाईडलाईन्स तयार केल्या आहेत. त्या गाईडलाईन नुसार अंमलबजावणी होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी अधिकार्‍यांची स्वतंत्र पथके तयार केली आहेत. प्रशासनाच्यावतीने शहरातील बांधकाम व्यावसायीकांना तसेच मेट्रो प्रशासनाला महापालिकेच्या गाईडलाईन्स नुसार अंमलबजावणी करण्याबाबतचे पत्र पाठविले आहे. तसेच या व्यावसायीकांनी कामाच्या ठिकाणी नियमांनुसार पुर्तता केल्याबद्दल माहिती मागविली आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख मंगेश दिघे (Mangesh Dighe PMC) यांनी सांगितले. (Pune Air Pollution)

यासोबतच रहदारीच्या रस्त्यांवर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते अशा चौकांमध्ये मिस्ट बेसड् फाउंटन्स उभारण्यात येणार आहेत. पंधराव्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून १७ चौकांमध्ये २५ फाउंटन्स उभारण्यात येतील.

यासाठी चौकांमधील आयलँड वर १५ फुट उंच खांबावर असलेल्या या फाउंटनमधून फॉगसदृश्य तुषार उडतील.
यामुळे चौकांमध्ये आर्द्रता वाढून धुलीकणांचा त्रास बर्‍याच अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.
रात्रीच्यावेळी आणि पाउस पडत असताना हे फाउंटन बंद राहातील.
चौकांच्या सुशोभीकरणासोबतच प्रदूषण कमी करण्यासाठी हे फाउंटन्स उपयोगी ठरणार असल्याची माहिती मंगेश दिघे यांनी दिली.

याठिकाणी बसतील मिस्ट बेसड् फाउंटन

जेधे चौक, स्वारगेट (२), नळ स्टॉप (२), सिमला ऑफीस चौक (१), पुणे रेल्वे स्टेशन (१), गणेश खिंड (१),
मार्केटयार्ड जंक्शन (१), कात्रज (२), खराडी रिलायंन्स चौक (२), चांदणी चौक (३), वारजे (१), ब्रेमेन चौक (२),
महंमदवाडी (२), सारसबाग (१), डेक्कन चौक (१), पाषाणकर शोरुम समोर,
जंगली महाराज रोड (१), साधू वासवाणी चौक (१), संचेती पुल (१).

Leave A Reply

Your email address will not be published.