Gold Price Today | एकमेकांच्या विरूद्ध सोने आणि चांदीची वाटचाल, जाणून घ्या आजचे नवीन दर

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोमवारी सोने 176 रुपये मजबूत होऊन 47,881 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. मागील व्यवहाराच्या सत्रात सोने 47,705 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मजबूती आणि कमजोर होणार्‍या रुपयामुळे सोन्यात ही वाढ पहायला मिळत आहे. सोमवारी रुपयात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 9 पैशांची घसरण नोंदली गेली. (Gold Price Today)

चांदीच्या किमतीत 505 रुपयांची घसरण (Silver Price Today 17 January 2022) झाली आहे आणि ती सोमवारी 61,005 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात चांदी 61,510 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

एचडीएफसी सिक्युरिटीजने दिल्लीच्या सराफा बाजारातील दराबाबत माहिती दिली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (जिंस) तपन पटेल यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढून 1,822 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होता, तर चांदी 23.03 डॉलर प्रति औंसवर स्थिर होती. (Gold Price Today)

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today in delhi 17 january 2022


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LIC Jeevan Shiromani | केवळ 4 वर्षात तुम्हाला करोडपती बनवू शकते ‘ही’ LIC Policy, जाणून घ्या सविस्तर

Ration Card वर इतर कुणी घेत असेल लाभ तर रद्द होईल तुमचे कार्ड आणि भरावा लागेल दंड? जाणून घ्या

7th Pay Commission | खुशखबर ! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणखी एका भत्त्याची होणार वाढ; जाणून घ्या

Insurance Policy Tax | ‘या’ इन्श्युरन्स पॉलिसीवर मिळते 1.5 लाखापर्यंत कर सवलत, 31 मार्चपूर्वी घ्या निर्णय; जाणून घ्या

Multibagger Stock | 25 रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाख रुपयांचे 2 वर्षांत केले 30 लाख रुपये, जाणून घेवूयात एका दृष्टीक्षेपात

Leave A Reply

Your email address will not be published.