LIC Jeevan Shiromani | केवळ 4 वर्षात तुम्हाला करोडपती बनवू शकते ‘ही’ LIC Policy, जाणून घ्या सविस्तर

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Jeevan Shiromani | आजच्या युगात, शेअर बाजार जास्त रिटर्न देत आहे, ज्यामुळे तुम्हाला मोठा पैसा मिळतो, परंतु येथे पैसे सुरक्षित राहणे हे बाजारावर अवलंबून आहे. पण जर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, जिथे तुम्हाला कमी बजेटमध्ये जास्त नफा मिळेल आणि तुमचे गुंतवणुकीचे पैसेही सुरक्षित असतील, तर इथे LIC जीवन शिरोमणी (LIC Jeevan Shiromani) योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. या योजनेअंतर्गत तुम्ही फक्त चार प्रीमियम जमा करून तुम्ही करोडपती बनू शकता.

एलआयसी जीवन शिरोमणी योजना
या पॉलिसीमध्ये किमान 1 कोटी रकमेची हमी मिळते. म्हणजेच, जर तुम्ही 14 वर्षांसाठी एक रुपया जमा केला तर तुम्हाला एकूण एक कोटीपर्यंत रिटर्न मिळेल. LIC ची (Jeevan Shiromani Plan Benefits) ही एक नॉन-लिंक योजना आहे.

ही एक नॉन-लिंक, मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे. ही बाजाराशी संबंधित लाभ योजना आहे. ही योजना खास HNI (हाय नेट वर्थ व्यक्ती) साठी बनवली आहे. ही योजना गंभीर आजारांसाठी देखील संरक्षण प्रदान करते. यामध्ये 3 ऑप्शनल रायडर्स देखील उपलब्ध आहेत.

 

योजनेच्या अटी आणि नियम

1. किमान विमा रक्कम – रु 1 कोटी

2. कमाल विमा रक्कम : कोणतीही मर्यादा नाही (मूलभूत विमा रक्कम 5 लाखांच्या पटीत असेल.)

3. पॉलिसी टर्म : 14, 16, 18 आणि 20 वर्षे

4. केव्हापर्यंत प्रीमियम भरावा लागेल : 4 वर्षे

5. प्रवेशासाठी किमान वय : 18 वर्षे

6. प्रवेशासाठी कमाल वय : 14 वर्षांच्या पॉलिसीसाठी 55 वर्षे; 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी 51 वर्षे; 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी 48 वर्षे; 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 45 वर्षे. (LIC Jeevan Shiromani)

काय आहेत योजनेचे फायदे
जीवन शिरोमणी योजना, पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू लाभाच्या रूपात कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करते. या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास निश्चित कालावधीत पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कमही दिली जाते. ग्राहक पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या आधारे कर्ज घेऊ शकतो.

Web Title :- LIC Jeevan Shiromani | this lic policy will make you a millionaire in just 4 years know details of LIC Jeevan Shiromani

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ration Card वर इतर कुणी घेत असेल लाभ तर रद्द होईल तुमचे कार्ड आणि भरावा लागेल दंड? जाणून घ्या

7th Pay Commission | खुशखबर ! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणखी एका भत्त्याची होणार वाढ; जाणून घ्या

Insurance Policy Tax | ‘या’ इन्श्युरन्स पॉलिसीवर मिळते 1.5 लाखापर्यंत कर सवलत, 31 मार्चपूर्वी घ्या निर्णय; जाणून घ्या

Leave A Reply

Your email address will not be published.