Shobhatai Rasiklal Dhariwal | विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक व नव-नवीन तंत्रज्ञान शिकणे काळाची गरज – शोभाताई आर धारीवाल

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Shobhatai Rasiklal Dhariwal | विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती जपावी, आपले संस्कार आणि नीतिमूल्ये यांचे कायम जतन करावे. कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. त्यापेक्षा निसर्गप्रेमी व्हा, आज काल विद्यार्थी दशेतच अनेक मुलं व्यसनाधीन होत आहेत. त्यावर शिक्षकांनी, पालकांनी व समाजातील प्रत्येक घटकाने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे मत आर एम डी फाऊंडेशनच्या (RMD Foundation) उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी रसिकलाल मा. धारीवाल इंग्रजी शाळा कोंढवा येथे विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील दहावी-बारावीत गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आर एम डी इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा क्रम कायम ठेवला आहे. (Shobhatai Rasiklal Dhariwal)

यावेळी विद्यार्थ्यांनी जगातील नव-नवीन तंत्रज्ञान शिकावे, आत्मसात करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आर एम डी फाऊंडेशन द्वारा या शाळेस देण्यात आलेल्या स्मार्ट पॅनल बोर्ड तसेच आधुनिक संगणक लॅबचे उदघाटन शोभाताई आर धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. २००१ मध्ये एका छोट्याशा खोलीत २ विद्यार्थ्यांना घेऊन सुरु केलेल्या या शाळेत आज नर्सरी ते १२ वी पर्यंत विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील १६५० विध्यार्थी शिकत आहेत. एका रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आहे अशी भावना शोभाताईंनी यावेळी व्यक्त केली. आर एम डी फाऊंडेशन द्वारा गुणवत्ताधारक विध्यार्थ्यांना व शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना पक्षांच्या खाद्याचे घरटे भेट म्हणून देण्यात आले.

त्यानंतर शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण उपस्थितांच्या हस्ते पार पडले. यावेळी संस्थेचे विश्वस्त पोपटशेठ ओस्तवाल, ललित ओस्तवाल व संस्थेचे इतर सर्व विश्वस्त ,शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती बहुलेकर, उपमुख्याध्यापिका संध्या नाडगौडा, ज्ञानेश्वर देशमुख, शाळेचे शिक्षक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.