Pune Shivsena | शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिना निमित्त शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी व त्यांच्या टीमने अवघ्या 30 मिनिटांमध्ये केली 1111 वृक्षांची लागवड!

पुणे : Pune Shivsena | शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी व त्यांच्या टीम ने अवघ्या 30 मिनिटात विविध प्रजातीच्या 1111 वृक्षांचे रोपण करण्याचा विक्रम केला. निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, आपण या निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन ही शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले.
शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनाच्या औचित्याने पुणे शहरात विविध भागात वृक्षारोपण आयोजित केले होते, यातील हडपसर येथे भव्य वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1111 वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत एकनाथ शिंदे फॉउंडेशन, आनंदवन फॉउंडेशन यांच्या सहकार्याने महादेववाडी जवळील हेवन पार्क फ़ॉरेस्टच्या टेकडीवर वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वर्षी शिवसेना, एकनाथ शिंदे फॉउंडेशन समूह आणि आनंदवन फॉउंडेशनने या मोहिमेच्या माध्यमातून दिलेले 1100 वृक्ष लागवडीचे लक्ष्य दिले होते, ते आम्ही लोकसहभागातून पूर्ण केले असून, पुढील वर्षीही शिवसेना पुण्यात आपले ५ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण करेल.
सुदृढतेसोबतच पर्यावरण रक्षणासाठी एवढ्या मोठ्या संख्येने पुण्यातील विविध माळरानावर वृक्षारोपण करण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे . या अभियानतील वृक्षांच्या पालकत्वचा समारोह हडपसर येथील आनंदवन फॉउंडेशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, परिसरातील शेकडो जेष्ठ नागरिक या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते, पुण्यातील शिवसेनेच्या या मोहिमेला आता चळवळीचे स्वरूप आले असून देशपातळीवर अश्या मोहीम आयोजित करून लोकसहभागातून वृक्षारोपणाचे कार्य अतिशय कमी वेळेत साध्य करता येवू शकते, येत्या काळात ही चळवळ संपूर्ण देशात रुजवली जाणार आहे, नागरिकांच्या सहभागातून प्रत्येक टेकडी आपण हिरवी करू शकतो असा विश्वास माझे हडपसर,हिरवेगार हडपसर चे मुख्य संयोजक, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी व्यक्त केला या भव्य वृक्षारोपण अभियानात माझ्या समवेत आनंदवन फाउंडेशन चे अध्यक्ष प्रवीण कुमार आनंद,भूपेश शर्मा,रमेश नारायणी,विशाल पवार,मनीष घुले,जयंत नवरे,नीरव कुलश्रेष्ठ,यश चौधरी,प्रतीक रेबारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर घुले,उपशहर प्रमुख विकी माने,संतोष भानगिरे, प्रकाश लाकडे, जहीर शेख,रवींद्र भानगिरे, सचिन तरवडे,योगेश सुर्यवंशी, संतोष जाधव,रमेश शिंदे, स्मिता साबळे,सारिका पवार,निशा थोरात,राजश्री माने ,आशा यादव,प्रतिमा बोबडे,शीतल गाडे, सहभागी स्थानिक सोसायटया रहेजा विस्टा, हेवन पार्क, फिफ्थ अव्हेन्यू,सुयश निसर्ग,नमो विहार,उद्योग नगर,विघ्नहर्ता सोसायटी,गंगा व्हिलेज,आशीर्वाद पार्क, मार्गोसा सोसायटी, ओरीयंट व्ह्यू,सोसायटी मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वृक्षारोपण कार्यक्रमाला मिळाला.