Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक (Video)

0

मुंबई : Maharashtra Monsoon Session | राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालेले आहे. १४ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. पावसाळी अधिववेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर जमा होऊन जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावर प्रचंड गोंधळ घातला.

टक्केवारी सरकार, चोर सरकार अशा घोषणा देत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर गोंधळ घालून अधिवेशनात सरकारला कसं आणि किती धारेवर धरलं जाईल याचे संकेतच दिले आहेत.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले. आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाचा शेवट १२ जुलैला होणार आहे. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.