SBI Pay Record Dividend To Govt | SBI ने सरकारला दिला विक्रमी ६९५९ कोटी रुपयांचा डिव्हिडंट, या बँकेकडून सुद्धा मिळाले पैसे

0

नवी दिल्ली : SBI Pay Record Dividend To Govt | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने सरकारला विक्रमी डिव्हिडंट दिला आहे. भारतीय स्‍टेट बँकेचे चेअरमन दिनेश खारा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना ६९५९.२९ कोटी रुपयांचा चेक सोपवला. अर्थमंत्र्यांनी याबाबतची माहिती सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म एक्‍स वर दिली आहे. हा डिव्हिडंट आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आहे. एसबीआयसह बँक ऑफ महाराष्ट्रने सुद्धा डिव्हिडंट दिला आहे.

एसबीआयने आपल्या शेयर होल्डर्ससाठी १३.७० रुपये प्रती शेयरच्या डिव्हिडंटची घोषणा केली आहे. तर मागील आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारतीय स्‍टेट बँकेने ११.३० रुपये प्रती शेयरच्या डिव्हिडंटची घोषणा केली होती. आर्थिक वर्ष २०२४ च्या दरम्यान एसबीआयचे कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट विक्रमी ६७,०८५ कोटी रुपये आहे. तर यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते ५५,६४८ कोटी रुपये होते.

तर बँक ऑफ महाराष्ट्रने शुक्रवारी ८५७ कोटी रुपयांचा डिव्हिडंट दिला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची बीओएमचे मॅनेजिंग डायरेक्‍टर निधु सक्‍सेना आणि एग्‍झीक्‍यूटिव्ह डायरेक्‍टर आशीष पांडे यांनी भेट घेतली आणि त्यांना ८५७ कोटी रुपयांचा चेक दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.