Sharad Pawar-Mahavikas Aghadi | “लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या मात्र मविआ ऐक्यासाठी दोन पावले मागे आलो”; शरद पवारांचे वक्तव्य

0

पुणे : Sharad Pawar-Mahavikas Aghadi | शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची पुण्यातील निसर्ग हॉटेलला आज बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या.

परंतु त्यावेळी महाविकास आघाडीचे ऐक्य टिकून राहावे यासाठी दोन पावले मागे आलो असे शरद पवारांनी या बैठकीत म्हंटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नव्हते का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आपण एकत्रित राहिलो म्हणून लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे, याची तयारी ठेवा. त्यासाठी लोकांची जास्तीत जास्ते कामे करा. राज्यातील लोकांचा दिल्लीशी फारसा संबंध येत नाही. राज्यात जास्त प्रश्न असतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असे शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

दरम्यान, इंडिया आघाडी (India Aghadi) आणि महाविकास आघाडीत कुठलीही गडबड होऊ नये, यासाठी शरद पवारांनी लोकसभेला कमी जागांवर समाधान मानले. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगल्या जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाची मोठी ताकद आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण झाला आहे, असे शरद पवार गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.