Maharashtra Monsoon | गुडन्यूज! मान्सून जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणार सक्रिय; मुंबईत 24, 25 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता

0

मुंबई : Maharashtra Monsoon | मान्सूनच्या आगमनाचे वृत्त आले, आणि तो काही ठिकाणी बरसला सुद्धा. परंतु मागील काही दिवसांपासून त्याने उघडीप घेतल्याने पुन्हा एकदा प्रतीक्षा सुरू झाली होती. आता मान्सुन पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होत आहे. (Maharashtra Rains)

दरम्यान, याबाबत माहिती देताना पुणे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, आगामी चार दिवसात राज्याच्या बहुतांश भागांत पावसाची स्थिती सुधारेल. पावसात हळूहळू वाढ होईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसात आणखी वाढ होऊ शकते.

तसेच, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २४ आणि २५ जून रोजी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.