Dnyanda Foundation Pune | ‘ज्ञानदा फाउंडेशन’च्या माध्यमातून लेबर कॅम्प मधील मुलानां मोफत पुस्तक वाटप”

0

पुणे: Dnyanda Foundation Pune | ज्ञानदा फाऊंडेशन, पुणे या संस्थेच्या समग्र साक्षर अभियान या उपक्रमाअंतर्गत आणि श्री. नितीन माहेश्वरी यांच्या सहकार्याने दिनांक 22 जून 2024 रोजी ससुन वसाहत पुणे स्टेशन येथील बालविकास शिक्षण संस्था प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बालमित्र उजळणी पुस्तकाचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव यांनी मनोगत व स्वागत केले. हडपसर परिसरातील अमॅनोरा लेबर कॅम्प येथील मजूरांच्या मुलानां शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन येण्यासाठी बालविकास शिक्षण संस्था प्राथमिक शाळा नेहमी अग्रेसर असते. या शाळेत विद्यार्थ्याना नियमित शिक्षण दिले जाते. तसेच शिक्षणाबरोबर या मुलानां नियमित मध्यान्ह भोजन देखिल दिले जाते. कोणतेही शुल्क न घेता या विद्यार्थ्याना मोफत शिक्षण दिले जाते. आज ज्ञानदा फाऊंडेशन आणि श्री. नितीन माहेश्वरी यांच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्याना बालमित्र उजळणी पुस्तकाचे वाटप होत यांचा आम्हाला आनंद होत आहे. असे मुख्याध्यापिका जाधव म्हणाल्या.

तसेच शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये या करिता ज्ञानदा फाऊंडेशन या संस्थेने समग्र साक्षर अभियान हा उपक्रम सन-2021 साली सुरू केला असून या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, विना अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, अक्षर ओळख होऊन शैक्षणिक पाया भक्कम व्हावा म्हणून विविध शाळांमध्ये शैक्षणिक पुस्तकांचे मोफत वितरण केले जाते. त्याचप्रमाणे बालविकास शिक्षण संस्था प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना बालमित्र पुस्तकांचे वाटप करण्यात आले असल्याचे राहुल पोखरकर यांनी माहिती दिली. या कार्यक्रमास नितीन माहेश्वरी, कोमल माहेश्वरी, विवेक नायडू मानसेवी अधिकारी नागरी संरक्षण दल, विवेक कांबळे वरिष्ठ लिपिक, ओंकार पोखरकर ही उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.