Tanaji Sawant Meet Prasad Dethe Family | आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या प्रसाद देठेच्या कुटुंबीयांची मंत्री सावंत यांनी घेतली सांत्वनपर भेट; कुटुंबाला पाच लाखांचा धनादेश देत तिन्ही मुलांचे स्वीकारले पालकत्व

0

शिक्रापूर : (सचिन धुमाळ) – Tanaji Sawant Meet Prasad Dethe Family | राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षण (Maratha Reservation) अत्यंत कळीचा मुद्दा होऊन गेला आहे. एका बाजूने मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Maonj Jarange Patil) यांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्या पाठीराखांकडून, समर्थकांकडून मात्र नैराश्येपोटी आत्महत्यांची (Suicide For Maratha Reservation) मालिकाच सुरू आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) सुद्धा आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे राज्यांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असंच चित्र निर्माण झालं आहे.

पुण्याच्या वाघोली (Wagholi) परिसरात राहणाऱ्या व मूळ बार्शी तालुक्यातील असलेल्या प्रसाद देठे (Prasad Dethe Suicide) यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु झाल्यानंतर प्रसाद देठे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते. त्याबाबत ते आपली भूमिकाही मांडत होते.

प्रसाद देठे या मराठा तरुणाच्या कुटुंबाला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांत्वन पर भेट दिली. यावेळी तानाजी सावंत यांच्याकडून या कुटुंबाला पाच लाखांचा धनादेश देत आर्थिक मदत करण्यात आली. या भेटीवेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

देठे कुटुंबातील तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलत तिन्ही मुलांचे पालकत्व स्वीकारल्याचे तानाजी सावंत यांनी जाहीर केले. मराठा समाजातील तरुणांनी अशी टोकाची भूमिका न घेता कुटुंबाकडे लक्ष द्या. अशा घटनेमुळे कुटुंब उघड्यावर पडतात असे देखील तानाजी सावंत यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.