Shivsena Ramdas Kadam On BJP | महायुतीत वाद, राष्ट्रवादीनंतर रामदास कदमांनी भाजपालाही सुनावलं, एकनाथ शिंदेंवर तुम्ही अन्याय केला, तर मिटकरींना म्हणाले…

0

मुंबई : Shivsena Ramdas Kadam On BJP | शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर केलेल्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिले होते. मात्र कदम हे आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीला तुमची लंगोट आमच्यामुळे वाचल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील भाजपा नेत्यांना देखील विधानसभेच्या (Maharashtra Assembly Elections 2024) जागांवरून चांगलेच सुनावले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

रामदास कदम यांनी भाजपाला सुनावताना म्हटले की, तुम्ही जर सव्र्हे केला होता मग तुमच्या जागा पडल्या का?, भाजपाच्या काही नेत्यांमुळे त्यांच्या पक्षाचे नुकसान झाले, शिवसेनेचे झाले आणि मोदींचेही (PM Narendra Modi) झाले.

एक एक आकडा महत्त्वाचा असताना लोकसभेसाठी भाजपाच्या काही नेत्यांनी केलेल्या हट्टामुळे एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) अन्याय झाला. तो अन्याय आता होता कामा नये ही, भावना माझ्या कालच्या भाषणात होती. आता विधानसभेत सर्व्हेचे आम्ही ऐकणार नाही. तुम्ही तुमचे बघावे, असे कदम म्हणाले.

विधानसभेच्या जागांबाबत रामदास कदम म्हणाले, आम्हाला १०० जागा द्या, ही विनंतीवजा मागणी भाजपाकडे आहे. एकनाथ शिंदे यांना १५ जागा लोकसभेच्या मिळाल्या, शिवसेना म्हणून १८ खासदार होते. तेवढ्या जागा मिळायला हव्या होत्या. भाजपाच्या जागा २ महिने आधी जाहीर झाल्या तसेच शिवसेनेचे उमेदवार झाले असते तर किमान १३-१४ जागा आल्या असत्या.

रामदास कदम म्हणाले, नाशिकमध्ये भुजबळांना दोनदा पाडल्यानंतरही ती जागा आमचीच अशी मागणी करत होते. हिंगोली, ठाणे जागा मागत होते. ३ जागा बदलाव्या लागल्याने आमच्या ४-५ जागा कमी झाल्या.

दरम्यान, शिवसेना वर्धापन दिनी रामदास कदम यांनी अजित पवार महायुतीत आणखी उशीरा आले पाहिजे होते, असे वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी त्यांना उत्तर दिले होते. या वक्तव्याचा खुलासा करताना रामदास कदम म्हणाले, अजित पवार थोडे उशीरा आले असते, तर मंत्रिमंडळ विस्तारात ती ९ मंत्रि‍पदे आम्हाला मिळाली असती.

ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी काही जणांना शब्द दिले होते. महाडचे भरतशेठ गोगावले (Bharatshet Gogawale) कधीपासून सफारी शिवून तयार आहेत. ते वाट बघत आहेत. २-४ जणांना शब्द दिला होता आणि तो पाळता येत नाही. त्यामुळे मी अजितदादा (Ajit Pawar) उशीरा आले असते तर त्या शब्दाची अंमलबजावणी झाली असती असे विधान केले, असे कदम म्हणाले.

तर अमोल मिटकरी यांना प्रत्युत्तर देताना रामदास कदम म्हणाले, मला महायुतीत कुठेही मिठाचा खडा टाकायचा नाही. सुनील तटकरे (Sunil Tatkare) निवडून आले आणि तुमची लंगोटी वाचली. तटकरेंना जागा कशी मिळाली, त्यांच्यासाठी आम्ही काय केले हे विचारावे, त्यामुळे पहिल्यांदा तुमची लंगोट सांभाळा, असे कदम म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.