Sharad Pawar – Maharashtra Assembly Elections 2024 | “पुढचा डोस कधी द्यायचा हे मी तुम्हाला सांगेन…एक चमत्कार तुम्ही करा, एक मी करतो” पवारांच्या वक्तव्याची चर्चा

0

बारामती: Sharad Pawar – Maharashtra Assembly Elections 2024 | शरद पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. दरम्यान पवारांनी लोकसभा विजयाच्या निमित्ताने विधानसभेच्या पेरणीला सुरुवात केली आहे. बारामतीमधील लोणी भापकर (Loni Bhapkar) गावात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, “जे काम करायचं होतं ते तुम्ही केलं, मला काही सांगायची वेळ आली नाही. मोदींपेक्षा (PM Narendra Modi) जास्त मताने तुमचा खासदार निवडून आला आहे. मोदी सांगायचे मोदी की गॅरंटी. पण उनकी गॅरंटी यहा चली नही, मोदींनी काय माझा बांध कोरला नाही. पण, मोदींचे धोरण आपल्या हिताचे नव्हते. शेतकरी अडचणीत कसा येईल याचा विचार मोदी सरकार करते.

मोदी सरकारमधील लोक म्हणतात आम्ही खाणाऱ्या लोकांचा विचार करतो परंतु पिकवणाऱ्याने पिकवले नाही तर खाणारा काय खाईल?” तसेच, काहीही करा पण जमीन विकू नका, जमीन विकू नका मार्ग आपण काढू असा मोलाचा सल्लाही शरद पवारांनी गावकऱ्यांना दिला. सत्ताधाऱ्यांनी काळ्या आईशी ईमान राखणाऱ्या लोकांचा विचार केला पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.

“दमदाटी केली तरी कोणतं बटण दाबायचे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, ते तुम्ही दाबलं. या निवडणुकीत एकही पुढारी नव्हता, कुठं गेले होते काय माहित? मी विचारायचो हे होते का, ते होते का, ते कुणीही नव्हतं. कळलं नाही नेत्याला काय झालं? जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा कळलं? आता हा चमत्कार विधानसभेला करायचा आहे.

एक चमत्कार तुम्ही करायचा एक चमत्कार मी. पहिले पाणी आणायचं, मग कोणतं कांडे रोवयाचे आणि कोणता डोस कधी द्यायचा हे मी सांगतो ” असे म्हणत आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंगही पवारांनी फुंकले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.