Swargate Pune Crime News | सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांकडून अटक, घरफोडी व मोबाईल चोरीचे गुन्हे उघड

0

पुणे : – Swargate Pune Crime News | घरफोडी व मोबाईल चोरी (Mobile Theft) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Criminal On Police Record) स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) अटक करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल व सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. शाहरुख सल्लाउद्दीन खतीब (वय-22 रा. भाग्योदयनगर, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Arrest In House Burglary)

घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध तपास पथकाकडून घेण्यात येत होता. पोलीस अंमलदार संदीप घुले, सुजय पवार व अनिस शेख यांना माहिती मिळाली की, स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी शाहरूख खतीब धोबीघाट परिसरात आला आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचला. पोलिसांना पाहून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक गुन्हे गीता बागवडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार संदीप घुले, सुजय पवार, अनिस शेख, शिवा गायकवाड, हर्षल शिंदे, फिरोज शेख, दिपक खेंदाड, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.