Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: हॉस्पिटलच्या बांधकामाचा स्लॅब कोसळून 9 कामगार गंभीर जखमी, अजिंक्य डी.वाय. पाटील कॅम्पसमधील घटना

0

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | हॉस्पिटलचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळून 9 कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना दिघी येथे घडली आहे. ही घटना चऱ्होली बुद्रुक येथील अजिंक्य डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पस (Ajeenkya DY Patil College of Engineering Lohegaon) मध्ये मंगळवारी (दि.18) रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी (Dighi Police Station) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस हवालदार अनिल रामचंद्र शिंदे (वय-36) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कारपेंटर चे कॉन्ट्रॅक्ट मोहंमद अबरार आलम आणि काँक्रेट चे कॉन्ट्रॅक्टर मोहंमद रशीद राजा यांच्यावर आयपीसी 337, 338, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, चऱ्होली बुद्रुक येथे अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ आहे. इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये हॉस्पिटलच्या इमारतीचे काम सुरु आहे.

मंगळवारी इमारतीच्या समोरील पोर्चचे बांधकाम सुरू होते. पोर्चवर स्लॅब टाकताना स्लॅबच्या खालील बाजुस लावलेल्या सपोर्टची योग्य ती काळजी घेतली नाही. त्यामुळे स्लॅब कोसळला. यामध्ये नऊ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी स्लॅब टाकताना निष्काळजीपणा केल्यामुळे हा अपघात होऊन नऊ कामगार जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बांधकाम मजूराला मारहाण

चाकण : दारु पिऊन कामावर येत असल्याने व काम करत नसल्याने दोन कामगारांना कामावरुन कमी केले. याचा राग आल्याने दोघांनी बंधकाम साईटवर येऊन गोंधळ घातला. गोंधळ घालणाऱ्यांना हकलून देत असताना दोघांनी एकावर धारदार हत्याराने डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मंगळवारी (दि.18) रात्री साडे आठ ते बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या दरम्यान आंबेठाण येथील लेबर कॅम्पमध्ये घडला.

कमलेश शर्मा असे जखमी झालेल्या मजूराचे नाव आहे. याबाबत ठेकेदार रणजित अमृत राठोड (वय-28 रा. वासुली गाव, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन धरमेंद्र (वय-36 रा. बस्ती, उत्तर प्रदेश), श्याम बिहारी (वय-42) यांच्यावर आयपीसी 307, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.