Pune ACB Trap Case | जमीन मोजण्यासाठी मागितली 4 लाखांची लाच; भूमापकाविरोधात गुन्हा दाखल

0

पुणे : Pune ACB Trap Case | देहूगाव (Dehugaon) येथील जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दौलत मधुकर गायकवाड Daulat Madhukar Gaikwad (वय ३५ वर्षे, भू करमापक भूमी अभिलेख कार्यालय, हवेली, येरवडा, पुणे.), योगेश्वर राजेंद्र मारणे Yogeshwar Rajendra Marne (वय २५ वर्षे , रा एरंडवणे ,पुणे) यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ १२ अन्वये येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Bribe Case)

जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी दौलत गायकवाड यांच्या सांगण्यावरून योगेश्वर मारणे ४ लाख रुपयांमधील ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे. याबाबतचा अधिक तपास ला. प्र. वि पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (PI Shriram Shinde) करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे ला. प्र. वि पुणे. यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.