Gold Price | इथंच थांबणार नाहीत सोन्याचे दर…वाढून 1 लाखाच्या पुढं पोहोचतील? सतत का येतेय तेजी, जाणून घ्या

0

नवी दिल्ली : Gold Price | सोने आणि चांदीच्या किमती मागील काही दिवसात विक्रमी स्तरावर पोहोचल्या होत्या. मात्र, यातील चांदीच्या दरात थोडी घसरण झाली आहे. जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी वाढवल्याने सोन्यात तेजी आली आहे. जगभरातील वाढता तणाव आणि महागाई दरम्यान सोन्याची मागणी वाढत आहे.

वल्र्ड गोल्ड कौन्सिलनुसार, २०२३ मध्ये जगभरातील केंद्रीय बँकांनी १,०३७ टन सोने खरेदी केले आहे. यापूर्वी २०२२ मध्ये केंद्रीय बँकांनी १,०८२ टन सोन्याची खरेदी केली होती. या वर्षातच केंद्रीय बँकांनी जानेवारीपासून मार्चपर्यंत २९० टन सोने खरेदी केले.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुढील १२ महिन्यात सुद्धा केंद्रीय बँकांची सोने खरेदी थांबणार नाही. डब्ल्यूजीसीने केलेल्या सर्वेत सहभागी ७० पैकी ८१ टक्के केंद्रीय बँकांनी म्हटले की, यावर्षी ऑफिशियल सेक्टरचे गोल्ड रिझर्व वाढेल. ६९% नी म्हटले की, ५ वर्षात परदेशी चलन भांडारात सोन्याची भागीदारी वाढेल.

आगामी महिन्यांमध्ये सोन्याच्या दरातील मजबूती कायम राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय बँकांच्या सातत्याने सोने खरेदीमुळे पुढील अक्षय तृतीया पर्यंत सोने एक लाख रुपये प्रति १० ग्रॅमचा आकडा पार करू शकते. मात्र, एक लाख दरापर्यंत पोहोचण्यासाठी सोन्याला पुढील १२ महिन्यात सुमारे ४०% रिटर्न द्यावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.