Binance Fined | जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजचा भारताने पिळला कान, ठोठावला 18.82 कोटी रुपयांचा दंड

0

नवी दिल्ली : Binance Fined | जगातील सर्वात मोठी क्रिप्‍टो एक्‍सचेंज बिनान्सला भारताने २.२५ मिलियन डॉलर म्हणजे सुमारे १८.८२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अर्थ मंत्रालयाअंतर्गत येत असलेल्या फायनान्शियल इन्टेलिजन्स यूनिटने अँटी मनी लॉन्ड्रिंग कायद्याचे पालन न केल्याने बिनान्सवर हा दंड लावला आहे.

जानेवारी २०२४ मध्ये, बिनान्स त्या नऊ ऑफशोअर क्रिप्टोकरन्सी प्लॅटफार्म पैकी एक होते, ज्यांना वेब अ‍ॅड्रेस आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून भारतात ऑपरेट करण्यावर बंदी घालण्यात आली होती. ही कारवाई एफआययू आणि पीएमएलए मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याने करण्यात आली होती.

अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, बियान्स हा दंड भरून आणि नियामकांना नियमाचे पालन करण्याचे आश्वासन देऊन भारतात पुन्हा व्यवहार सुरू करू शकते.

आर्थिक नियामकाने एका सूचनेत म्हटले आहे की, बियान्सच्या लेखी आणि तोंडी सादरीकरणानंतर, एफआययू-आयएनडीच्या संचालकांना रेकॉर्डवर उपलब्ध सामग्रीच्या आधारावर आढळले की, बियान्सविरुध्द आरोप सिद्ध झाले आहेत. बियान्सला १८.८२ कोटी रुपयांचा दंड द्यावा लागेल आणि सोबतच आर्थिक क्रियाकलाप रोखण्यासाठी आणि दहशतवादाच्या आर्थिक पोषणाचा सामना करण्यासाठी पीएमएलए २००२ च्या अध्याय चार चे पालन करावे लागेल आणि पीएमएलए रेकॉर्ड देखभाल नियम २००५ अंतर्गत सर्व व्यवहारांचा रेकॉर्ड ठेवावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.