Tea Production | चहाचा घोटही महागणार, यावर्षी असे काय घडले की दर वाढण्याची आहे शक्यता

0

नवी दिल्ली : Tea Production | एका चहा उद्योगाने अंदाज वर्तवला आहे की, अनुकूल हवामानाची स्थिती न झाल्याने उत्तर भारतीय चहा उद्योगाला चालू पिक वर्षाच्या जूनपर्यंत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ६० दशलक्ष किलोग्रॅम उत्पादन तुटीचा सामना करावा लागत आहे.

चहा इंडस्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, पहिल्या आणि दुसऱ्या फ्लश पिकाचे नुकसान झाले आहे. अशावेळी उच्च गुणवत्तेच्या चहाचे उत्पादन कमी होऊ शकते. चहाचे उत्पादन कमी झाल्यामुळे चहाच्या दरात वाढ होऊ शकते.

उत्तर भारतीय चहा उद्योगात आसाम आणि पश्चिम बंगाल राज्याचा समावेश आहे. या राज्यात पाऊस होत नसल्याने तसेच भीषण गरमी असल्याने चहाचे उत्पादन पूर्णपणे प्रभावित होत आहे.

टी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संदीप सिंघानिया यांचा अंदाज आहे की मागील वर्षाच्या उत्पादनाच्या तुलनेत जूनपर्यंत संयुक्त पिक नुकसान ६० दशलक्ष किलोग्रॅम होण्याचा अंदाज आहे.

असोसिएशनचे सदस्य असलेल्या चहाच्या मळ्यांद्वारे सांगण्यात आले की, आसाम आणि पश्चिम बंगालमधील चहाचे मळे मागील वर्षाच्या तुलनेत मे २०२४ च्या दरम्यान अनुक्रमे जवळपास २० टक्के आणि ४० टक्के मागे राहण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या आकड्यांनुसार, पश्चिम बंगालच्या प्रमुख चहा उत्पादक जिल्ह्यांमध्ये या कालावधीत सामान्य पावसाच्या तुलनेत ५० ते ८० टक्के आणि आसाममध्ये १० ते ३० टक्केच्या दरम्यान खुप कमी पाऊस झाला आहे. सूर्यप्रकाश सुद्धा विशेष नव्हता.

भारतीय चहा बोर्डाच्या आकड्यांवरून समजते की, मागील वर्षाच्या कालावधीच्या तुलनेत एप्रिल २०२४ पर्यंत आसाममध्ये उत्पादनात जवळपास ८ टक्के आणि पश्चिम बंगालमध्येजवळपास १३ टक्के घसरण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.