Ajit Pawar NCP On Eknath Shinde Shivsena | ‘अजित पवार वेळेत आले, म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, नाहीतर…’; राष्ट्रवादीचा शिंदे गटावर निशाणा

0

मुंबई : Ajit Pawar NCP On Eknath Shinde Shivsena | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची स्तुती करताना रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले की, “दोन-अडीच वर्षात तुम्ही क्रांतिकारी निर्णय घेतले. महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी घेतले नाहीत असे निर्णय तुम्ही तिघांनी मिळून घेतलेत. फडणवीसांचही (Devendra Fadnavis) अभिनंदन, मागून आलेले दादा, थोडे दिवस आले नसते तरी चाललं असतं असे म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला. शिवसेनेचा काल वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

रामदास कदम हे शिवसेना शिंदे गटात आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) ३१ उमेदवार निवडून आले. त्याचवेळी महायुतीला फक्त १७ जागांवर समाधान मानाव लागले. (BJP) भाजपा ९, शिवसेना शिंदे गट ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसची १ जागा निवडून आली.

अजित पवार महायुतीत आल्यामुळे काही फायदा झाला नाही, उलट नुकसान झालं असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यामुळे महायुतीचे नुकसान झाले, असे महायुतीमध्ये काही जणांना वाटते . तेच रामदास कदम बोलून गेले. त्यावरुन आता महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

राष्टवादीकडूनही आता कदमांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “अजित पवार वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली नाहीतर कमंडलू घेऊन हिमालय़ात गोसावी म्हणून फिरावं लागल असतं. रामदास कदम यांनी आपला आवाका पाहून बोलावं . अजितदादांना जर कोणी असं वारंवार बोलणार असेल, तुम्ही अशा पद्धतीने अंगावर येणार असाल, तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही” असं अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.