Vinayak Raut – Narayan Rane | नारायण राणेंची खासदारकी रद्द करा! विनायक राऊतांकडून निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस

0

मुंबई : Vinayak Raut – Narayan Rane | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी दिली होती. तर ठाकरे गटाकडून (Shivsena UBT) विनायक राऊत यांनी उमेदवारी देण्यात आली होती. नारायण राणे विरूद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असा पारंपरिक राजकीय सामना रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात होत असल्याने ही निवडणूक दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली होती.

मात्र, नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा पराभव केला. दरम्यान, नारायण राणे यांचा विजय हा दमदाटी आणि पैशाच्या जोरावर झाल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. तेव्हापासूनच नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. आता यासंदर्भात विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

निवडणूक प्रचार कालावधी हा ५ मे रोजी संपलेला असतानाही भाजप कार्यकर्ते ६ मे रोजी सुद्धा सुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करीत होते. प्रचार संपलेला असतानाही नारायण राणे समर्थक हे ई. व्ही. एम. मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

तसेच, नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले की, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याच कडे निधी मागायला यायचं आहे. लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही”, अशी धमकी १३ एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली. त्याचाही उल्लेख नोटिशीमध्ये करण्यात आला आहे.

नारायण राणे , नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणेंच्या विजयाची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी विनंती विनायक राऊत यांनी नोटिसीतून केली आहे. नारायण राणेंच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल असेही राऊत म्हणाले.

अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे. भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आले आहेत. हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखवणारे आहेत. व त्याबाबत नागरिक म्ह्णून भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचे ॲड असीम सरोदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.