Pune Traffic Updates | डेक्कन वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेत तात्पुरत्या बदलाचे आदेश जारी

0

पुणे : Pune Traffic Updates | वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील डेक्कन वाहतूक विभागांतर्गत (Deccan Traffic Division) रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

डेक्क्न वाहतूक विभागांतर्गत प्रभात रस्ता गल्ली नंबर १ मध्ये दक्षिणेस प्रथमेश सोसायटी व उत्तर पश्चिमेस अमित बोसम सोसायटी पर्यंत पी-१, पी-२ पार्कीग फक्त दुचाकीसाठी तर दक्षिणेस असलेल्या लक्ष्मी निवास ते उत्तरेस असलेले अभिनंदन बंगला या दरम्यान फक्त चारचाकीसाठी पी-१,पी-२ पार्कीग करण्यात येत आहे.

दक्षिणेस असलेल्या लक्ष्मी निवास ते ग्रीनपार्क मधील सोसायटीचे गेट सोडून, उत्तरेस असलेले अभिनंदन बंगला ते निसर्ग सोसायटी ठिकाणी सोसायटीचे गेट सोडून फक्त चारचाकीसाठी पी-१, पी-२ पार्कीग तर उत्तरेस असलेले निसर्ग सोसायटीचे बाहेरील बाजूस असलेले अॅड. अभ्यंकर चौक या ठिकाणी १५ फूट अंतरावर चारचाकी वाहनांसाठी चारचाकी पार्कंग करण्यात येत आहे.

पार्किंग व्यवस्था बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात ३ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.