Koregaon Park Pune Crime News | पुणे : भरदिवसा तरुणीसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या तरुणाला अटक, कोरेगाव पार्क परिसरातील घटना

0

पुणे : Koregaon Park Pune Crime News | रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणींसोबत असभ्य वर्तन करण्याच्या घटना कोरेगाव पार्क परिसरात वारंवार घडत आहेत. अशीच एक घटना बुधवारी (दि.19) दुपारी चारच्या सुमारास घडली. एक तरुणी रस्ताने पायी जात असताना एका तरुणाने पाठीमागून येऊन तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police Station) एका तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार पीडित तरुणी राहत असलेल्या पि.जी. गेटजवळ घडला आहे.

याबाबत 26 वर्षीय तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रशांत महादेव विटकर Prashant Mahadev Vitkar (वय-23 रा. ताई आरकेट अपार्टमेंट शेजारी, सावरकर चाळ, पाषाण, पुणे) याच्यावर आयपीसी 354(अ) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोरेगाव पार्क परिसरात राहतात. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास त्या परिसरातील एका मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. (Molestation Case)

सामान खरेदी करुन पी.जी. गेटजवळ पोहचताच आरोपी त्याच्या दुचाकीवरुन पाठीमागून आला. त्याने फिर्यादी यांना अश्लील स्पर्श करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन निघून गेला. पिडीत तरुणीने याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.