Hadapsar Pune Crime News | हडपसर: बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये आढळला, खून की आत्महत्या?

0

पुणे : Hadapsar Pune Crime News | घरात कोणाला काहीएक न सांगता निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये (Dead Body In Water Tanker) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत उघडकीस आली आहे. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसमध्ये (Fursungi Power House) पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा खून आहे की आत्महत्या याबाबत हडपसर पोलीस (Hadapsar Police Station) तपास करीत आहेत.

कौशल्या मुकेश चव्हाण (वय-25 रा. दुगड चाळ, हांडेवाडी) असे या महिलेचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (वय-27 रा.दुगड चाळ, हांडेवाडी) यांचा पाण्याचा टँकरचा व्यवसाय आहे. बुधवारी दिवसभर पुणे शहरातील विविध भागात पाणी पुरवठा केल्यानंतर रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास टँकर घराजवळ उभा केला. त्यानंतर ते घरी निघून गेले.

गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे टँकर घेऊन रामटेकडी (Ramtekadi) येथे पाणी भरण्यासाठी गेले. टँकरमध्ये पाणी भरून ते फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका घरी पाणी पोचवण्यासाठी गेले. पाणी सोडत असताना पाणी बाहेर येत नसल्याने त्यांनी सुरुवातीला वॉल्व्ह तपासला. तरी देखील पाणी येत नसल्याने त्यांना पाईप काढून पाहिला असता आतून साडी आल्याचे दिसले. त्यांनी टँकरवर चढून झाकण उघडून पाहिले असता आतमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत हडपसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवला.

ही महिला नेमकी कोणत्या कारणामुळे घरातून बेपत्ता झाली होती याचा तपास पोलीस करीत आहेत. तसेच हा खून आहे की आत्महत्या याबाबत अद्याप समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.