Dehu Raod Pimpri Crime News | पिंपरी: दोन वर्षाच्या मुलावर तलवार फिरवून धमकी, दहशत माजवणाऱ्या महिलेसह चार जणांवर FIR

0

पिंपरी : Dehu Raod Pimpri Crime News | तिघांनी एका महिलेला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली (Death Threats). तसेच दोन वर्षाच्या मुलावर तलवार फिरवून खानदान संपवून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने हातातील तलवार हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. हा प्रकार रविवारी (दि.16) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास देहुरोड येथे घडला आहे.

याबाबत किवळे परिसरातील जुनवणे वस्ती (Junavane Vasti Kiwale) येथे राहणाऱ्या 46 वर्षीय महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन नेहा जोगदंड (वय-32 रा. महादेव वाडी, खडकी) व तिच्या इतर दोन ते तीन साथीदारांवर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला देहूरोड येथे वडापावच्या हातगाडीवर असताना संशयित महिला तिथे आली. तिने फिर्यादीस चहा बनवण्याच्या भांड्याने व कानावर जोरात ठोसा मारुन जखमी केले. त्यात फिर्यादीच्या कानातील झुमका पडून गहाळ झाला. फिर्यादी यांची सून भांडणे सोडवण्यासाठी आली असता संशयिताने सुनेला देखील मारहाण केली. तसेच सुनेचा हात पिरगाळून मोठमोठ्या शिवीगाळ केली.

फिर्यादीच्या दोन वर्षीय नातवावर तलवार फिरवून तुमचे खानदान संपवून टाकणार, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी नेहा हिने हातातील तलवार हवेत फिरवून दहशत माजवली. तर तिच्या साथीदारांनी फिर्यादी यांना अश्लील शिवागाळ करुन तुम्हाल खुप माज आहे, तुम्ही आमच्या नादी लागलात तर तुमचे खांनदान संपवून टाकू अशी धमकी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.