Ashadhi Wari 2024 | शरद पवार करणार ‘विठु नामा’ चा गजर! आषाढी वारीत पायी चालणार

0

पुणे : Ashadhi Wari 2024 | आषाढी वारी सोहळा (Palkhi Sohala) जवळ येऊन ठेपला आहे. पंढरपूर (Pandharpur Wari 2024) येथे १७ जुलै रोजी आषाढी वारी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी देहू (Dehu) येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2024) तर आळंदी (Alandi) येथून ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2024) हा २९ जून रोजी निघणार आहे.

‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम गेली दहा वर्षे राबविला जात आहे. यंदाचे हे ११ वे वर्ष आहे. यावर्षी संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा हा ७ जुलै रोजी बारामती ते सणसर दरम्यान जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत शरद पवार (Sharad Pawar) हे देखील या सोहळ्यात सहभागी होऊन पायी चालणार आहेत. अशी माहिती शाम सुंदर महाराज सोन्नरकर यांनी दिली. पवार यांच्या सोबत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार (Ulhas Pawar) हे देखील सहभागी होणार आहेत.

या उपक्रमाची माहिती पवार यांना देण्यासाठी शामसुंदर महाराज सोन्नर (Shamsundar Maharaj Sonnar) , सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी सोमवारी (दि. १७) मुंबईतील ‘सिव्हर ओक’ येथे शरद पवार यांची भेट घेतली. वारीतील विचार, शिस्त, बंधूभाव, समता हा विचार ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ यात सहभागी होणारी मंडळी दिवसभर चालून समजून घेतात. हा उपक्रम शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली व शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, सुभाष वारे, राजाभाऊ अवसक, विशाल विमल, दत्ता पाकिरे यांच्या पुढाकाराने आयोजित केला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.