Ajit Pawar NCP – Vidhan Parishad Election | विधानपरिषद निवडणुकीत एक अल्पसंख्याक तर एक दलित चेहरा; अजित पवारांकडून समतोल राखण्याचा प्रयत्न

0

मुंबई : Ajit Pawar NCP – Vidhan Parishad Election | लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) अजित पवार गटाला अवघी एक जागा जिंकता आली. त्यानंतर पक्षातील आमदार पुन्हा परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, केंद्रात मंत्रिपदावरूनचे नाराजी नाट्य, राज्यसभेच्या (Rajya Sabha) खासदारकीबाबत पक्षातील मतभेद हे सर्व चव्हाट्यावर यायला वेळ लागला नाही. मात्र आता आगामी निवडणुकांच्या संदर्भाने अजित पवारांनी पुन्हा दंड थोपटले आहेत.

विधानपरिषद निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केली आहे. विधानपरिषदेवरील ११ रिक्त जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. यावेळी विधानपरिषदेवर राष्ट्रवादी एक अल्पसंख्याक, तर एक दलित समाजातील चेहरा पाठवणार असल्याची माहिती आहे. राज्यसभेवर सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांच्या रुपाने अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा चेहरा दिला.

त्यानंतर आता होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी एक अल्पसंख्याक, तर एक दलित चेहरा पाठवणार असल्याचं बोललं जात आहे. बाबाजानी दुर्रानी (Babajani Durrani) आणि सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) यांची नावं विधानपरिषदेसाठी चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षापासून दुरावलेली अल्पसंख्याक आणि दलित मतं पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी सुरु केल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.