Police Inspector Suspended | चौकशीत दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची आधी बदली नंतर निलंबन

0

नागपूर : – Police Inspector Suspended | दिघोरी नाक्याजवळ हिट अँड रनची (Nagpur Hit & Run Case) घटना घडली होती. मध्यरात्री रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील लोकांना मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून चिरडले होते. यात दोघांचा मृत्यू झाला तर लहान बालक जखमी झाला आहे. पोलिसांनी (Nagpur Police) याप्रकरणी पाच जणांना अटक केली. नागपूर हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

दिघोरी टोल नाक्यावरील (Dighori Toll Naka Accident) हे प्रकरण घडून 48 तास लोटले आहेत. मात्र, तरी रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅब म्हणजे न्यायवैद्यक विज्ञान प्रयोग शाळेत कार चालकाचे ब्लड सँपल पाठवण्यात आले नाही. यात झालेल्या कामाच्या कुचराईमुळे पोलीस निरीक्षक विजय दिघे (PI Vijay Dighe) यांना पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल (Ravinder Singal IPS) यांनी निलंबित केले आहे. विजय दिघे याच्याबाबत यापूर्वी अनेक तक्रारी आल्याचेही समोर आलं आहे. त्यामुळे आधी बदलीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी दिघे यांचे थेट निलंबन केले.

आरोपीने दारूच्या नशेत चालवली गाडी

आरोपी चालकासह कारमध्ये सहा विद्यार्थी होते. त्यातील सर्वच जण दारूच्या नशेत वाढदिवस साजरा करून फिरायला निघाले होते. भूषण नरेश लांजेवार (वय -20 रा. दिघोरी) असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. राजेंद्र बागडिया (वय-34) यांच्या तक्रारीवरून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात कांतीबाई गजोड बागडिया (वय- 42) आणि सीताराम बाबूलाल बागडिया (वय-30 दोघे रा. करवर, अरियाली, जि. बुंदी, राजस्थान) यांचा मृत्यू झाला आहे. तर कविता बागडिया (वय-28), बुलको बागडिया (वय-8), हसीना बागडिया (वय-3), सकीना बागडिया (वय- दीड वर्ष), हनुमान बागडिया (वय-35), विक्रम ऊर्फ भूषा (वय-10) आणि पानबाई (वय- 15) अशी जखमींची नावे आहेत. मेडिकल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी हसीना आणि सकीना यांची प्रकृती चिंताजनक आहे.

दोन तासात आरोपी गजाआड

वाठोडा पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत आरोपींना पकडले. इतर आरोपींमध्ये वंश राजू झाडे (वय-19 रा. योगेश्वर नगर वाठोडा), सन्मय दिगांबर पात्रिकर (वय-20 रा. अंबानगर दिघोरी), अथर्व सरीता बानाईत (वय-20 रा. अयोध्यानगर हुडकेश्वर), ऋषिकेश धनंजय चौबे (वय-20 रा. रामेश्वरी अजनी), अथर्व मोगरे (वय-20 रा. महाल) यांचा समावेश आहे. वंश हा बी. फार्मचे शिक्षण घेत आहे. तर इतर आरोपी इंजिनीअरिंगचे विद्यार्थी आहेत. वंश याचा वाढदिवसाची घरी पार्टी केल्यानंतर सर्व मित्र भूषणच्या कारने फिरायला निघाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.