Insurance Rules | खुशखबर! लाईफ इन्श्‍युरंस पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास आता मिळतील पहिल्यापेक्षा जास्त पैसे

0

नवी दिल्ली : Insurance Rules | इन्श्युरंस रेग्‍युलेटर इरडाने एक महिन्यापूर्वी नियमात बदल करण्याची घोषणा केली होती. मात्र, इन्श्‍युरंस कंपन्यांना इरडाकडून लागू केलेले नवीन नियम पसंत नव्हते. कंपन्यांची इच्छा होती की जुनेच नियम सुरू ठेवावे. परंतु इरडाने नियमात कोणत्याही प्रकारे बदल करण्यास नकार दिला. नव्या नियमानुसार, जर तुम्ही कोणत्याही कारणामुळे लाईफ इन्श्‍युरंस पॉलिसी मध्येच बंद केली तर पहिल्यापेक्षा जास्त पैसे तुम्हाला मिळतील. पैसे परत मिळण्याच्या या प्रक्रियेला स्पेशल सरेंडर व्हॅल्यू म्हटले जाते.

कंपनीच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता

एचडीएफसी लाईफच्या एका प्रवक्त्याने मनीकंट्रोलला सांगितले की, पॉलिसी होल्‍डरला लवकर पॉलिसी बंद केल्यास पहिल्यापेक्षा जास्त पैसे मिळाल्याने कंपनीच्या नफ्यात सुमारे १०० बेसिस पॉईन्टचा परिणाम होण्याचा अंदाज आहे.

परंतु, आम्ही ही कमतरता ग्राहकांना मिळत असलेल्या लाभांशी तडजोड न करता दूर करण्यात सक्षम होऊ. आमचे म्हणणे आहे की, नवीन नियम दिर्घ कालावधीत संपूर्ण इन्श्युरंस इंडस्ट्रीची वाढ करण्यात उपयोगी ठरतील.

सूत्रांचे म्हणणे आहे की, मोठ्या संख्येत लोक सुरुवातीच्या वर्षात आपली पॉलिसी सरेंडर करतात. यासाठी हा नवीन नियम अशा लोकांसाठी खुप लाभदायक आहे. मात्र, नंतरच्या वर्षात सरेंडर केल्यास जास्त पैसे मिळतील. परंतु ती रक्कम सुरुवातीच्या वर्षांच्या तुलनेत कमी असेल.

इरडाचे म्हणणे आहे की, जर मध्येच पॉलिसी बंद केली तर मिळणारे पैसे किमान तेवढे असावेत जेवढे पैसे भविष्यात मिळणार असलेल्या सम इंश्‍युअर्ड आणि अन्य लाभ मिळून आजच्या हिशोबाने होतात. मात्र, विमा कंपन्यांचा यास विरोध होता. कंपन्यांचे म्हणणे होते की,‍ इन्श्‍युरंस लवकर पैसे काढण्यासाठी नसतो तर भविष्यासाठी बचत करण्यासाठी असतो. या नवीन नियमामुळे इन्श्युरंस कंपन्यांना जास्त पैसे रिझर्व ठेवावे लागतील.

तसेच आता प्रत्येक लाईफ इन्श्‍युरन्स कंपनीला आपल्या ग्राहकांना एक ग्राहक माहितीपत्र द्यावे लागेल. या पत्रात पॉलिसी संबंधी सर्व माहिती सोप्या भाषेत लिहिलेली असेल, जसे की इन्श्युरंसच्या अटी, लाभ, प्रीमियम रक्कम आणि इतर आवश्यक माहिती.

Leave A Reply

Your email address will not be published.