Dhanori Pune Accident News | पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह? भरधाव कारने रिक्षाला उडवले, धानोरीतील मध्यरात्रीची घटना

0

पुणे : – Dhanori Pune Accident News | पुण्यातील धानोरी परिसरात मध्यरात्री एका भरधाव वेगात जाणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाला जोरात धडक दिली. यामध्ये रिक्षातील चारजण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर (Porwal Road Dhanori) झाला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आईस्क्रीम खाण्यासाठी रिक्षा चालक थांबला होता. यावेळी रिक्षामध्ये दोन महिला आणि लहान मुलगा आणि रिक्षा चालक असे चौघेजण होते. त्यावेळी पोरवाल रस्त्यावरुन एक कार भरधाव वेगात आली. कारने रिक्षाला जोरात धडक दिली. यामध्ये रिक्षातील चौघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्तळी धाव घेतली. कारचालक असलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय चाचणीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अहवालानंतर कार चालकाने मद्यपान केले आहे का हे समजू शकेल. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालक आणि त्याच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवण्यात आला असून पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.