Murlidhar Mohol | माझा विजय गिरीश बापट यांना समर्पित! मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रीया

0

पुणे : – Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा पराभव केला. विजयी झाल्यानंतर मोहोळ यांनी माध्यांशी संवाद साधताना, माझा विजय स्वर्गीय नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांना समर्पित करतो. त्यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा सभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराजयानंतर आमच्या हातून कसबा गेला अशी चर्चा होती. मात्र, या निवडणुकीत कसबा मतदारसंघातून मताधिक्य मिळवत कसब्यावर आमचे वर्चस्व सिद्ध केले आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, कॅन्टोन्मेंटमधून कमी मताधिक्य मिळाले, असे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. परंतु, महायुतीतील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र यांच्या पाठबळावर मी निवडून आलो. पुढील काळात रस्ते, विमानतळ आणि मेट्रो विस्तारीकरण, पीएमपीएमएल सक्षमीकरण आणि जाहीरनाम्यात दिलेले मुद्दे मार्गी लावणार असून दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी भाजप केंद्रीय सरचिटणीस पदावर असून, महाराष्ट्रातील भाजप, महायुतीबाबत लागलेल्या अनाकलनीय निकालाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलतील, असेही मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.