SBI Fixed Deposit Interest Rate Increased | SBI ने दिली खुशखबर, 211 दिवसांच्या FD वर मिळेल 7 टक्के व्याज, चेक करा लेटेस्ट एफडी रेट्स

0

नवी दिल्ली : SBI Fixed Deposit Interest Rate Increased | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफडीवर व्याज दर वाढवले आहेत. एसबीआयने ३ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर १५ जून, २०२४ पासून प्रभावी झाले आहेत. आता एसबीआयचे गुंतवणुकदार एफडीवर जास्त नफा मिळवू शकतात.

एसबीआयने काही विशेष कालावधीच्या डिपॉझिट्सवर २५ बेसिस पॉइंट (०.२५ टक्के) ची वाढ केली आहे. बँकेने १८० दिवसांपासून २१० दिवसांपर्यंत आणि २११ दिवसांपासून १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर व्याज वाढवले आहे.

एसबीआयचे एफडी दर –
७ दिवसापासून ४५ दिवस : सामान्य लोकांसाठी – ३.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ४ टक्के
४६ दिवसापासून १७९ दिवस : सामान्य लोकांसाठी – ५.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६ टक्के
१८० दिवसापासून २१० दिवस : सामान्य लोकांसाठी – ६.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.७५ टक्के
२११ दिवसापासून १ वर्षापेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी – ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७ टक्के
१ वर्षापासून २ वर्षापेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी – ६.८० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.३० टक्के
२ वर्षापासून ३ वर्षापेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी – ७.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.५० टक्के
३ वर्षापासून ५ वर्षापेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी – ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.२५ टक्के
५ वर्षापासून १० वर्षापर्यंत : सामान्य लोकांसाठी – ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.५० टक्के

Leave A Reply

Your email address will not be published.