Pune Crime Branch News | पुणे: नऱ्हे भागात गुन्हे शाखेची मोठी कारवाई, दीड कोटी रुपयांचा गुटखा जप्त

0

पुणे : Pune Crime Branch News | पुण्यातील नऱ्हे परिसरातील खाडेवाडी (Khadewadi Narhe Pune) येथील एका गोडाऊनवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून एक कोटी 39 लाखांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. यामध्ये काही कच्चा माल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे या ठिकाणी गुटखा तयार करण्यात येत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी परराज्यातील चार जणांना अटक केली असून या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पुष्पेंद्र अकबाल सिंग (वय- 27), सुनील पथ्थन सिंग (वय-45), चंदन अजयपाल सिंग (वय-32 सर्व रा.नर्‍हे, मूळ. रा.उत्तरप्रदेश), मुकेश कालुराम गेहलोत (वय- 28 रा.आंबेगाव, मूळ. रा, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, आरोपींचा साथीदार नीलेश ललवानी (वय-40, रा, नर्‍हे) याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री नऱ्हे भागातील खाडेवाडी येथे एका गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा असून तिथून पुणे शहर आणि परिसरात गुटखा वितरीत होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार युनिट दोन, सामाजिक सुरक्षा विभागासह (SS Cell Pune) इतर पथकांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी एका विशिष्ट प्रकारच्या गुटख्याची 98 लाख 88 हजार रुपयांची 207 पोती आणि 5 लाख 76 हजार रुपयांचा दुसऱ्या प्रकारच्या गुटख्याची 20 पोती जप्त केली तसेच काही कच्चा माल देखील जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (Amol Zende DCP) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.