Stock Market | या आठवड्यात शेयर बाजारात तेजी की घसरण? जाणून घ्या कसा असेल बाजाराचा कल

0

नवी दिल्ली : Stock Market | मागील आठवड्यात बीएसईचा ३० शेयरचा सेन्सेक्स २९९.४१ अंक फायद्यात होता. तर, अनालिस्ट्सनुसार, अंतर्गत आघाडीवर कोणत्याही प्रमुख इंडिकेटरच्या अभावात या आठवड्यात शेयर बाजाराची दिशा ग्लोबल ट्रेंडवर अवलंबून असेल. कमी ट्रेडिंग सेशनच्या आडवड्यादरम्यान बाजार प्रामुख्याने परदेशी गुंतवणुकदारांच्या हालचालींवर दिशा घेईल. (Share Market)

याशिवाय ग्लोबल लेव्हलवर ब्रेंट क्रुड ऑईलचे दर आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा चढ-उतार सुद्धा बाजाराच्या दृष्टीने महत्वाचा राहील. सोमवारी (१७ जून) बकरी ईद निमित्त शेयर बाजार बंद राहतील.

स्वस्तिका इन्व्हेस्ट मार्ट लि.चे रिसर्च हेड संतोष मीणा यांनी म्हटले की, हा आठवडा कमी ट्रेडिंग सेशनचा आहे आणि कोणत्याही मोठ्या इंडिकेटरचा अभाव आहे. मात्र, बजेटबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान संबंधीत शेयरमध्ये हालचाली दिसू शकतात. प्रामुख्याने बाजाराचा ट्रेड मान्सूनची प्रगती आणि इन्स्टीट्यूशनल इन्व्हेस्टरच्या फ्लो वर अवलंबून राहील. जागतिक आघाडीवर चीनचा डेटा, डॉलर इंडेक्सचा चढ-उतार तसेच अमेरिकेत बाँड यील्ड बाजारच्या दृष्टीने महत्वाचा राहील.

कमी ट्रेडिंग सेशनचा आठवडा

रेलिगेयर ब्रोकिंग लिमिटेडचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट (रिसर्च) अजित मिश्रा म्हणाले, सोमवारच्या सुट्टीमुळे हा कमी व्यवहाराच्या सत्रांचा आठवडा आहे. आठवड्यादरम्यान बाजार भागीदारांचे लक्ष ग्लोबल मार्केट्स, प्रामुख्याने अमेरिकन मार्केटवर राहील.

मागील आठवड्यात शेयर बाजारात होती तेजी

मागील आठवड्यात बीएसईचा ३० शेयरचा सेन्सेक्स २९९.४१ अंक अथवा ०.३९ टक्के लाभात राहीला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १७५.४५ अंक अथवा ०.७५ टक्के वाढला. सेन्सेक्स १३ जून रोजी ७७,१४५.४६ अंकाच्या आपल्या ऑल टाइम हायवर पोहोचला, तर निफ्टीने १४ जूनला २३,४९०.४० अंकाच्या आपल्या नव्या उच्चांकावर पोहोचला.

बाजारातील तेजीचा कल कायम राहण्याची अपेक्षा

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्विसेसचे रिटेल रिसर्च हेड सिद्धार्थ खेमका यांनी म्हटले की, अंतर्गत बाजार सोमवारी बंद राहतील, तर जागतिक स्तरावर गुंतवणुकदारांचे लक्ष बँक ऑफ इंग्लंडच्या व्याजदराच्या निर्णयाकडे राहील.

खेमका म्हणाले, आम्हाला अपेक्षा आहे की, पॉझिटिव्ह मॅक्रो ट्रेंड, सरकारी खर्च जारी राहणे आणि धोरणात्मक आघाडीवर सातत्याची अपेक्षादरम्यान बाजारात तेजीचा कल कायम राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.