Sinhagad Road Pune Crime News | पुणे : वाहन चोरी करणाऱ्या दाम्पत्याला सिंहगड पोलिसांकडून अटक, 8 चारचाकी व 9 दुचाकी जप्त

0

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | पुणे शहरातील वेगवेगळ्या लॉज मध्ये थांबून परिसरात रेकी करून रात्रीच्यावेळी चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी (Vehicle Theft Detection) करणाऱ्या पती-पत्नीला सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याकडून 12 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 8 चारचाकी व 9 दुचाकी असे एकूण 17 वाहने जप्त केली आहेत. (Arrest In Vehicle Theft)

सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर वाहन चोरांचा शोध घेण्यासाठी सिंहगड रोड पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. तपास पथकाकडून वाहन चोरांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार उत्तम तारु, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर यांना महिती मिळाली की, वाहन चोरी करणारे पुरुष व महिला आरोपी लोणीकाळभोर येथील वडकीनाला परिसरात कार मध्ये बसले आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता पुणे शहरातून 17 दुचाकी व चारचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली. त्यातील चोरी केलेल्या एकूण 8 चारचाकी व 9 दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींनी चोरलेली वाहने नागपूर, शिर्डी, श्रीरामपूर येथे विकली होती. तपास पथकाने त्याठिकाणी जाऊन वाहने जप्त करुन 12 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींकडे केलेल्या तपासात ते दोघे पती-पत्नी असल्याचे समोर आले. पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर राहुन दिवसभर टेहाळणी करुन रात्री चारचाकी व दुचाकी वाहने चोरी करत होते. दोघे पती-पत्नी असल्याने कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने वाहन चोरी करत होते. पोलिसांनी दोन महिने दोघांचा मागोवा घेऊन त्यांना अटक केली आहे. आरोपींकडून सिंहगड रोड – 5, भारती विद्यापीठ – 2, हडपसर -2, कोरेगाव पार्क-2, कोंढवा-वारजे माळवाडी-समर्थ-वानवडी-बिबवेवाडी-नागपूर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण 17 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पाटोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, शिरीष गावडे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.