Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : भागीदारीत व्यवसाय करण्याच्या आमिषाने महिलेची 5 लाखांची फसवणूक

0

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | चहाची फ्रॅचायसी घेऊन भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने एका दाम्पत्याची पाच लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. हा प्रकार फेब्रुवारी 2023 ते 14 जून 2024 या कालावधीत दिघी येथे घडला आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी (Dighi Police Station) जालना येथील एका व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सुवर्णा प्रकाश तांबे (वय-39 रा. दिघी, ता हवेली) यांनी शुक्रवारी (दि.14) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मनोज बाबुराव राठोड Manoj Baburao Rathod (रा.प्लॅट नं. 57, ब्लॉक सेक्टर, जलाना रोड, जालना) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज राठोड याने महिलेचा विश्वास संपादन करुन चहाची फ्रॅचायसी घेऊन भागीदारीत व्यवसाय करु असे आमिष दाखवले. महिलेने आरोपीवर विश्वास ठेवून व्यवसायासाठी तीन लाख रुपये दिले. त्यानंतर मनोज राठोड याने व्यवसायासाठी एक लाख रुपये कमी पडत असल्याचे सांगून महिलेकडून 30.6 ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले. तारण ठेवलेले दागीने लगेच सोडवून घेतो असे सांगून दागिने भोसरी येथील मनपुरम फायनान्स येथे तारण ठेवून एक लाख रुपये कर्ज घेतले. त्यानंतर महिलेला कोणतीही कल्पना न देता सोने तारण कर्जावर आणखी टॉपअप कर्ज घेतले. तसेच त्यांच्या पतीकडून देखील पैसे घेतले आरोपी मनोज राठोड याने फिर्यादी व त्यांच्या पतीची पाच लाख रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.