Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : बनावट दस्त करुन शासनाची व वारसदारांची पावणे चार कोटींची फसवणूक

0

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | बनावट कुलमुखत्यारपत्र (Fake Power Of Attorney) बनवून त्या पत्राच्या आधारे जमिनीचा दस्त रजिस्टर करुन शासनाची व वारसदार यांची पावणे चार कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 27 सप्टेंबर 2006 ते 29 सप्टेंबर 2006 या कालावधी सह दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक 5 च्या कार्यालयात घडला आहे. या प्रकरणी एका महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत सह दुय्यम निबंधक हवेली क्र.-5 अनिता राजेंद्रकुमार कणसे यांनी शुक्रवारी (दि.14 जून) चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन मनिषा कश्यप वाधवा Manisha Kashyap Wadhwa (रा. गोपी टँक रोड, सिटी लाईट सिनेमाच्या बाजूला, माहिम, मुंबई) यांच्यावर आयपीसी 4250, 465, 467, 468, 471, सह नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पिंपरी वाघेरे येथे माहेश्वरी आणि कंपनीची 90 गुंठे जमीन आहे. ही जमीन कंपनीचे अधिकृत भागीदार सावित्री मोहनदास वाधवा, लिलाराम हिदोमल कृपलानी, हरीराम मोहनदास वाधवा व हरदासमल एन देवनानी यांच्या नावावर आहे. यापैकी लिलाराम कृपलाणी यांचे 1981 मध्ये निधन झाले आहे. आरोपी मनिषा कश्यप वाधवा यांनी मयत कृपलाणी यांच्याकडून जमिनीचे स्वत:च्या नावाने बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करुन घेतले.

त्या कुलमुखत्यार पत्राच्या आधारे आरोपी महिलेने 90 गुंठ्यापैकी 22.5 गुंठे जमीन त्यांचे पती कश्यप हरीराम वाधवा (2012 मध्ये निधन झाले) यांच्या नावाने बक्षीस पत्र दस्त रजिस्टर करुन घेतला. आरोपी महिलेने बनावट कागदपत्राच्या आधारे दस्त तयार करुन शासनाची फसवणूक केली. तसेच कंपनीचे भागिदार यांची 46 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केली. या जमिनीचे सध्याचे बाजारमूल्य 3 कोटी 83 लाख 55 हजार 500 रुपये इतके आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मनिषा कश्यप वाधवा हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.