Mutual Funds | 15x15x15 इन्व्हेस्टचा हा नियम तुम्हाला बनवू शकतो करोडपती, जाणून घ्या काय आहे तो?

0

नवी दिल्ली : Mutual Funds | प्रत्येकाला आशा असते की निवृत्तीला आपण किमान करोडपती असावे. परंतु, चुकीची गुंतवणूक केली तर हे स्वप्न पूर्ण होत नाही. तुम्हाला सुद्धा करोडपती बनायचे असेल तर यासाठी तुम्हाला 15x15x15 चा रूल फॉलो करावा लागेल. यानुसार, गुंतवणुकीचा १५ वर्षांचा कालावधी, १५ हजार रुपयांची एसआयपी आणि १५ टक्के वार्षिक रिटर्नच्या आधारावर असावा.

एका वर्षात १.८ लाख रुपयांची गुंतवणूक

तुम्ही दर महिन्याला १५ हजार रुपयांची एसआयपी केल्यास वर्षभरात १.८ लाख रुपयांची गुंतवणूक करता. अशाप्रकारे १५ वर्षात एकुण २७ लाख रुपये जमा कराल. जर यावर वार्षिक १५% रिटर्न मिळाला तर १५ वर्षानंतर तुमचे २७ लाख रुपये १ कोटी रुपयांपेक्षा जास्त होतील.

कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी १५ वर्षांचा कालावधी आदर्श टेन्‍योर आहे, या काळात तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा पूर्ण फायदा मिळतो. हे सर्व कॅलक्युलेशन अंदाजावर आधारीत आहे. बाजाराची स्थिती आणि तुम्ही निवडलेल्या म्युचुअल फंडाच्या आधारावर रिटर्न बदलू सुद्धा शकतो.

बाजारातील चढ-उताराचा परिणाम म्युचुअल फंडाच्या रिटर्नवर सुद्धा होतो. कोणत्या म्युचुअल फंडात गुंतवणूक करता, हे सुद्धा रिटर्नला प्रभावित करते. वेगवेगळे फंड वेगवेगळ्या संपत्तीमध्ये पैसा गुंतवतात आणि त्यांची जोखीम सुद्धा वेगवेगळी असते. यामुळे मिळणारा रिटर्नसुद्धा वेगळा असू शकतो. जेवढ्या जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करता, रिटर्न तेवढा चांगला मिळतो.

जर तुमचे लाँग टर्म टारगेट असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलियोमध्ये जास्त स्टॉक ठेवू शकता. परंतु जर तुम्हाला भविष्यात लकवरच पैशाची गरज असेल तर बाँडवर फोकस करू शकता. पैसा कुठे गुंतवता हे तुमच्या गरजांवर अवलंबून आहे.

तुम्हाला निवृत्तीसाठी बचत करायची असेल तर तुम्ही तुमच्या पैशाचा मोठा भाग स्टॉकमध्ये लावू शकता. मोठ्या कालावधीत स्टॉकमधून चांगला रिटर्न मिळण्याची शक्यता असते. परंतु जर तुमचे पैसे बाँडमध्ये गुंतवले तर कमी रिटर्न मिळेल पण पैसे सुरक्षित राहतील. तसेच तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचा देखील विचार केला पाहिजे. कमी जोखीम पसंत करणारे लोक बाँडमध्ये गुंतवणुक करू शकतात. परंतु जास्त जोखीम घेऊ शकत असाल तर तुमची जास्त रिटर्नची शक्यता वाढते.

Leave A Reply

Your email address will not be published.