FIR On Pethe Jewellers’ Owners | पुणे : 50 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी ‘पेठे ज्वेलर्स’च्या मालकांवर गुन्हा दाखल

0

पुणे : – FIR On Pethe Jewellers’ Owners | पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध पेठे ज्वेलर्सच्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. नेकलेस व डायमंडच्या बांगड्या देण्याचे आमिष दाखवून पेठे ज्वेलर्सच्या मालकांनी एका व्यक्तीकडून 60 लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतर नेकलेस आणि डयमंडच्या बांगड्या न देता त्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक केली (Cheating Fraud Case) . याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पराग चंद्रकांत पेठे ( Parag Chandrakant Pethe) आणि तनय पराग पेठे Tanay Parag Pethe (रा. कपिल वास्तु, कर्वेनगर, पुणे, सध्या रा. सहवास सोसायटी, कर्वेनगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी देवेंद्र विनोदचंद्र शहा (वय-49 रा. पर्वती दर्शन, पुणे) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सन 2017 ते 17 जून 2024 या कालावधीत आयडीयल कॉलनी परिसरातील पेठे ज्वेलर्स या दुकानात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठे ज्वेलर्सचे मालक पराग पेठे आणि तनय पेठे यांनी फिर्यादी यांना कमी भावात नेकलेस आणि डायमंडच्या बांगड्या देण्याचे आमिष दाखवले. तसेच फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादी शहा यांनी दोघांवर विश्वास ठेवून रोख 25 लाख आणि आरटीजीएसद्वारे 35 लाख असे एकूण 60 लाख रुपये पेठे यांच्याकडे गुंतवले. त्यानंतर फिर्यादी आणि आरोपी यांच्यात स्टॅम्प पेपरवर करार झाला. मात्र, आरोपींनी फिर्यादी यांना कराराप्रमाणे नेकलेस आणि डायमंडच्या बांगड्या दिल्या नाहीत.

फिर्यादी यांनी आरोपींकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. शहा यांनी पैशासाठी तगादा लावला असता पराग पेठे यांनी 10 लाख रुपये दिले. मात्र, उर्वरित रक्कम अद्यापपर्यंत दिलेली नाही. त्यामुळे विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शहा यांनी कोथरुड पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.