Maharashtra Assembly Elections 2024 | भाजप खरच विधानसभा स्वबळावर लढणार का? अजित पवारांना दूर ठेवण्यासाठी सर्व्हे?

0

मुंबई : Maharashtra Assembly Elections 2024 | राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Lok Sabha Election Results) महायुतीतील (Mahayuti) घटकपक्ष विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढणार अशी एक चर्चा सुरु झालेली आहे. शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (Ajit Pawar NCP) सोबत असतानाही भाजपाला अपयश मिळाले. अपयशानंतर भाजप पक्षांतर्गत एक सर्व्हे करत असल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा सर्वाधिक आहेत.

उत्तर प्रदेशात ८० तर महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. महाराष्ट्रात भाजपला फक्त ९ जागांवर विजय मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात अजित पवार यांना भाजपने सोबत घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली. बहुमत असताना अजित पवार यांना सोबत का घेतले, असा सवाल देखील मुखपत्रात उपस्थित करण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर भाजप अंतर्गत सर्व्हे करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप विधानसभा स्वबळावर लढणार का?, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून भाजपची कामगिरी कशी असेल, राष्ट्रवादीसोबतची आघाडी कायम ठेवायची की नाही, असे प्रश्न सर्वेक्षणात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र भाजपचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी ही चर्चा फेटाळली आहे. ह्या विरोधकांनी पेरलेल्या बातम्या असल्याचे अजित चव्हाण म्हणाले.

आज पक्षांच्या वरिष्ठांच्या बैठका झाल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील होते. असा कुठलाही विचार भाजपच्या मनात नाही. महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांनी बातम्या पेरायच्या आणि आम्ही त्याला उत्तर देत फिरायचं हे अजिबात चालणार नाही, असे अजित चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.