Aundh Pune Crime News | पुणे: लिलावात स्वस्तात गाडी देण्याच्या बहाण्याने साडे 9 लाखांची फसवणूक, दोघांना अटक

0

पुणे : – Aundh Pune Crime News | पुणे वाहतुक विभागातील (Pune Traffic Police) लिलावातील गाड्या स्वस्तात देण्याच्या बहाण्याने दोघांनी एका तरुणाची 9 लाख 67 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2023 ते 13 जून 2024 या कालावधीत औंध येथील ब्रेमेन चौकात (Breman Chowk Aundh) घडला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत सलमान चाँदबाशा शेख (वय-28 रा. मु.पो. वाघोली, केसनंद फाटा, वाघोली) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.13) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल तुकाराम लोखंडे Anil Tukaram Lokhande (वय-37), ऋषिकेश महेश जाधव Rishikesh Mahesh Jadhav (वय-24 दोघे रा. पाण्याच्या टाकीजवळ, अप्पर इंदिरा नगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 170, 406, 420, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना वाहतुक विभागात कामाला असल्याचे सांगून लिलावातील गाड्या स्वस्तात मिळवून देतो असे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन लिलावतील गाड्या देण्याच्या बहाण्याने वेळोवेळी शेख यांच्याकडून पैसे घेतले. शेख यांनी दोघांवर विश्वास ठेवून त्यांना 9 लाख 67 हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी पुणे वाहतूक विभागाचे बनावट पत्र पाठवले. तसेच आरटीजीएस केल्याच्या खोट्या पावत्या पाठवल्या. मात्र, लोखंडे आणि जाधव यांनी फिर्यादी यांना गाड्या न देता पैशांचा अपहार करुन फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.