OBC Leader Laxman Hake | उपोषणासाठी अंतरवाली सराटीत निघालेल्या ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शी पोलिसांनी घेतले ताब्यात

0

बार्शी: OBC Leader Laxman Hake | मराठा समाजाला सगेसोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती, ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले. पण त्यानंतर माध्यमंही बोलताना तोडगा काढला नाही, तर उपचार घेणार नाही, अशी आपली भूमिका स्पष्ट केली.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी बचावासाठी हाके अंतरवाली सराटी याठिकाणी आमरण उपोषण करणार आहेत. अंबड मध्ये ओबीसी बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत अंतरवाली सराटीच्या वेशीवरील मंदिरात आमरण उपोषण करण्याचं ठरलं आहे. मात्र दोन्ही समाजात तणाव निर्माण होऊ नये म्ह्णून लक्ष्मण हाकेंना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेऊन उपोषण न करण्याचे आवाहन केले आहे. (Maratha Reservation Andolan)

Leave A Reply

Your email address will not be published.