Sunetra Ajit Pawar | राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ म्हणाले…

0

मुंबई : Sunetra Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडून पराभव झाल्यांनतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बारामती लोकसभेत पराभवानंतरही सुनेत्रा पवार यांचं खासदार होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता नणंद भावजया दिल्लीत खासदार म्हणून काम करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षानं अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांची निवड केली आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या निर्णयावर भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याची चर्चा होती.

याबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “पक्षानं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत खासदार म्हणून पाठवण्याचा एकमुखानं निर्णय घेतला. या पदासाठी मी इच्छूक होतो, मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं नाव अंतिम करण्यात आलं.

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी याबाबतची भूमिका घेतली. पक्षात अनेकही नेते राज्यसभेसाठी इच्छूक होते. मात्र सुनेत्रा पवार यांना आम्ही सगळ्यांनी मिळून उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीवरुन मी नाराज नाही”, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.