Anil Deshmukh On Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘मृत तरुण-तरुणी दारु पिऊन गाडी चालवत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न’ माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

0

पुणे : – Anil Deshmukh On Kalyani Nagar Car Accident Pune | मागील महिन्याभरापासून पुण्यातील पोर्शे कार अपघात चर्चेत आहे (Porsche Car Accident Pune). या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहे. या घटनेनंतर देशात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दुचाकीवरील दोघांना धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण (Bedum Marhan) करुन पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्पवयीन मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावयायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal Builder) याचा मुलगा आहे.

विशाल अग्रवाल याचा मुलगा लवकर बाहेर यावा यासाठी मृतांनाच दोषी ठरवणार असल्याची सरकारची तयारी सुरु असल्याचा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. आधी अल्पवयीन आरोपीच्या मुलाचे रक्ताचे नमुने बदले आता मृतांच्या व्हिसेरा रिपोर्टमध्येही बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा खळबळजनक आरोप देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या संदर्भातील पोस्ट केली आहे. अनिल देसमुख आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे.

जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.