Thane ACB Trap Case | अधिकाऱ्याला धक्का देऊन लाचेच्या रक्कमेसह पोलीस कर्मचाऱ्याने ठोकली धूम, एसीबीकडून गुन्हा दाखल

0

ठाणे : – Thane ACB Trap Case | सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी निजामपुरा पोलीस ठाण्यातील (Nizampura Police Station) पोलीस कर्मचाऱ्याने 29 हजार रुपये लाच स्वीकारली. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांना पाहताच लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याने उप अधीक्षकांना धक्का देऊन लाचेच्या रक्कमेसह पलायन केले. याप्रकरणी ठाणे एसीबीने पोलीस कर्मचारी निळकंठ सुभाषराव खडके (Nilakantha Subhasrao Khadke) याच्यावर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Thane Bribe Case)

निळकंठ खडके निजामपुरा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर आयपीसी 353, 323, 294, 506, 34 नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास खडके यांच्याकडे आहे. गुन्ह्यात अटक न करण्यासाठी खडके याने तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे एसीबीकडे सोमवारी (दि.10) पोलीस नाईक निळकंठ खडके लाच मागत असल्याची तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस नाईक खडके यांनी तक्रारदार यांना दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 29 हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार मंगळवारी निजामपुरा पोलीस ठाण्यात सापळा रचला. खडके याने शासकीय दुचाकीवर तक्रारदार यांना बसवून आदर्श पार्क जवळ नेऊन 29 हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर खडके पोलीस ठाण्यात आले.

निजामपुरा पोलीस ठाण्यात एसीबीच्या पथकाला पाहताच खडके यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एसीबीचे पोलीस उप अधीक्षक विशाल जाधव यांनी खडके याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने जाधव यांना धक्का देऊन लाचेच्या रकमेसह पळून गेला. खडके याने धक्का दिल्याने पोलीस उप अधीक्षक जखमी झाले आहेत. एसीबीच्या पथकाकडून लाचखोर निळकंठ खडके याचा शोध सुरु करण्यात आला आहे.

ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे एसीबीच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.